१५ ते १८ वयोगटातील ३० टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांपासून ते किशोरवयीन मुलांना लस दिली जात आहे. मात्र, सध्या कोरोनाचे घटणारी रुग्णसंख्या पाहचा लसीकरण घटल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय राज्यातील किशोरवयीन मुलांचही लसीकरण घटल्याचं समजतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आलं. मात्र सध्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची मोहीम मंदावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १८ वयोगटातील ३० टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर जवळपास ५९.५२ टक्के मुलांनी कोविड लसीचा एक डोस घेतला आहे.

१८ फेब्रुवारीपासून या आकड्यात किंचितशी वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीला राज्यात सरासरी २७ टक्के दोन्ही डोस आणि ५७ टक्के पहिला डोस झाला होता. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस ३ जानेवारीपासून १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांना दिली जात आहे. राज्यासह मुंबईतील किशोरवयीन मुलांचे लसीकरणाचे प्रमाणही कमीच आहे.

३ मार्चपर्यंत शहरात पहिल्या डोसचे प्रमाण ५४ टक्के एवढे आहे. तसंच, दोन्ही डोस देण्याचं प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे हेच प्रमाण १८ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे ४९.९ टक्के आणि २४.२ टक्के एवढे होते.

पुढील बातमी
इतर बातम्या