आता मेडिकलमध्येही उपलब्ध होणार कोरोना लस

राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय असून, राज्यात सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी लवकरच आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्येही खरेदी करता येणार आहेत.

केंद्र सरकारनं नेमलेल्या तज्ञांच्या विशेष समितीनं या दोन्ही लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. तज्ञांच्या समितीची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत सहभागी झालेल्या तज्ञांनी कोरोना लसींच्या चाचणीशी संबंधित कागदपत्रांचा आढावा घेतला. त्यानंतर दोन्ही लसींच्या खुल्या बाजारातील विक्रीचा मार्ग सुकर करण्यात आला आहे.

तज्ञांच्या समितीने दिलेल्या मंजुरीनुसार सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना देशभरात आपली वितरण व्यवस्था तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर या कंपन्या आपल्या लसी सर्व रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या