वरळी, प्रभादेवीत इतक्या जणांना कोरोनाची लागण

कोरोनानं मुंबईतील अनेक ठिकाणी जाळ टाकलं आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या वरळी, प्रभादेवी विभागात बाधित रुग्णांचा एकूण आकडा ५०० च्या पार गेला आहे. आरोग्य शिबिर आणि बाधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी, संशयितांचे क्वारंटाईन या उपक्रमांनंतर येथील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. 

महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या जी दक्षिण विभागात बुधवारपर्यंत ५०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल या परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

दक्षिण मध्य मुंबईतील माहीम, धारावी, दादर येथे रुग्ण संख्या वाढत असल्याचं वाटत असताना बुधवारी तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण कुर्ला परिसरात आढळून येऊ लागले आहेत.

कुर्ला परिसरात २६७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी जी उत्तर विभाग (धारावी, दादर) तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र एका दिवसात कुर्ला, अंधेरी पश्चिम, सायन, माटुंगा या विभागात बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेले विभाग

विभाग
ठिकाण
रुग्ण

डिस्चार्ज

जी-दक्षिण
वरळी, प्रभादेवी
५०७
७२
ई-भायखळा
मुंबई सेंट्रल
३६८
३१
एल
कुर्ला
२६७
के-पश्चिम
अंधेरी, विलेपार्ले
२६४
३२
एफ-उत्तर
सायन, माटुंगा
२६०
१६
जी-उत्तर
धारावी, दादर
२५७
२०

सर्वात कमी रुग्ण असलेले विभाग

विभाग
ठिकाण
रुग्ण
डिस्चार्ज
आर
दहिसर
२२
टी
मुलुंड
२६
सी
चिरा बाजार, काळबादेवी
२८
आर मध्य
बोरिवली
३६
१०

पुढील बातमी
इतर बातम्या