कोरोनाबद्दल शंका? मग, 'इथं' करा निरसन

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन पुरेपुर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे समाजातून देखील या संकटाचा सामना करण्यासाठी हात पुढे येत आहेत. या महामारीच्या संकटात राज्यातील अनेक डॉक्टर्स देवदूतांसारखे काम करत आहेत.

त्यात मुंबईतील काही खाजगी डॉक्टरांनी देखील एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मुंबईतील 30 डॉक्टरांच्या एका टीमनं फोनद्वारे नागरिकांना कोरोनाविषयी माहिती किंवा काही शंका असतील तर त्याचं निसरन करण्याचं काम सुरू केलं आहे.

खाजगी डॉक्टर मदतीला

डॉ. तुषार शाह यांच्यासह ३० डॉक्टर या माध्यमातून नागरिकांच्या शंकांचं निरसन फोनद्वारे करत आहेत. Physician Volunteers for Telephonic Guidance on Covid 19 या नावानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम सुरू केल्यानंतर चार तासातच किमान १०० च्या वर लोकांनी फोन करून कोरोनाविषयक माहिती आणि शंका विचारल्या आहेत.

भिती दूर करण्याचा प्रयत्न 

कोरोनाचा प्रकोप जगभरात वाढत आहे. मात्र तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही विकारांचा सामना करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल? याबाबत देखील माहिती दिली जात आहे. नागरिकांच्या मनात याबाबत भीती आहे. मात्र न घाबरता स्वच्छता आणि योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यावर कोरोनाची भीती नाही, असे सल्ले डॉक्टर रुग्णांना देत आहेत.

'या' नंबरवर करा कॉल

सकाळी ८ ते १२ या वेळेत

Dr Tushar Shah. 9321469911

Dr M Bhatt. 9320407074

Dr D Doshi. 9820237951

Dr D Rathod. 8879148679

Dr R Gwalani. 8779835257

Dr D Kansara. 8369846412

दुपारी 12 ते 4 या वेळेत

Dr G Kamath. 9136575405

Dr S Manglik. 9820222384

Dr J Jain. 7021092685

Dr A Thakkar. 9321470745

Dr L Bhagat. 9820732570

Dr N Shah. 9821140656

Dr S Phanse. 8779328220

Dr J Shah. 9869031354

सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत

Dr N Zaveri. 9321489748

Dr S Ansari. 7045720278

Dr L Kedia. 9321470560

Dr B Shukla. 9321489060

Dr S Halwai. 9867379346

Dr M Kotian. 8928650290

रात्री ८ ते १२ या वेळेत

Dr N Kumar. 8104605550

Dr P Bhargav. 9833887603

Dr R Chauhan. 9892135010

Dr B Kharat. 9969471815

Dr S Dhulekar. 9892139027

Dr S Pandit. 9422473277

या डॉक्टरांशी फोनवरुन संवाद करुन कोरोनासंबंधी विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. सोबतच २४ तासासाठी इंडियन मेडिकल असोशिएशनची हेल्पलाईन देखील यासाठी सुरु आहे. +919999672238 आणि +919999672239 या क्रमांकावर २४ तास कोरोनासंबंधी माहिती दिली जात आहे.



पुढील बातमी
इतर बातम्या