राज्यात सध्याच्या घडीला फक्त आठवड्याभराचाच रक्तसाठा शिल्लक आहे. येत्या काळात रक्ताची लागणारी मोठी गरज लक्षात घेऊन रक्तदाते आणि सामाजिक संस्थांनी पुढं यावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी केलं आहे.
कोरोनाच्या (coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती दिली.