coronavirus update: गुड न्यूज! मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी- राजेश टोपे

मुंबईत मंगळवारी करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी (plasma therapy) यशस्वी झाल्याने या थेरपीचा प्रयोग पुण्यासह इतर ठिकाणीही करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी बुधवार २९ एप्रिल रोजी दिली.

कोरोनावर मात

नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, मुंबईतील कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या एका तबलिगी जमातच्या (tablighi jamaat) सदस्याने मंगळवारी लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) जाऊन त्याचा प्लाझ्मा दिला होता. दिल्लीच्या मरकजमध्ये (markaz) गेलेल्या तबलिगीच्या या सदस्याला कोरोना (covid-19) झाला होता. त्यानंतर उपचारांना चांगला प्रतिसाद देत या व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

नायरमध्ये पुढचा प्रयोग

या व्यक्तीचा प्लाझ्मा घेऊन तो लिलावती रुग्णालयातील अन्य एका कोरोनाबाधित रुग्णाला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा दुसरा प्रयोग मुंबईच्याच नायर रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यासह इतर ठिकाणीही केंद्राच्या गाइडलाइननुसारच ही थेरपी केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

अशी आहे थेरपी

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ८०० मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे.  

दरम्यान, राज्यात ७२९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ९३१८ अशी झाली आहे. यापैकी १३८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा - वॉकहार्ट रुग्णालयात COVID 19 रुग्णांवर पुन्हा उपचार, २० रुग्णांवर करणार प्लाझ्मा थेरपी
पुढील बातमी
इतर बातम्या