Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह

मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर हिंदूच्या रुग्णालयाने खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेतल्या. डॉक्टर आणि नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

बोललं जातं की, शुक्रवारी दाखल झालेल्या रुग्णानं सुरुवातीला आपण दुबईहून आल्याची माहिती हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला दिली नाही. पण डॉक्टरांना दुबईहून आल्याचं कळल्यानंतर त्याची रवानगी कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर खबरदारी म्हणून हिंदुजा स्टाफमधील 70 ते 80 जणांच्या कोरोना व्हायरससाठी चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

चाचण्या जरी निगेटिव्ह आल्या असल्या तरी रुग्णालयानं खबरदारी म्हणून स्टाफमधील 70 ते 80 जणांना काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितलं आहे, अशी माहिती मिळत आहे. 

चीनमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात आपले हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं ग्रस्त असे 22 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरत आहे. 

याशिवाय महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेजेस ना राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. फक्त दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील. महाराष्ट्रातील काही कार्यालयांनी खबरदारीचे उपाय म्हणून वर्क फॉर्म होम लागू केलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या