सावधान! मुंबईत पुन्हा वाढतोय 'कोरोना'चा प्रादुर्भाव

मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना बधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागानं या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवत नागरिकांना दिलासा दिला. परंतु, सध्या थंडीचे दिवस सुरू असून, त्यात दिवाळीचा येऊन गेला त्यामुळं दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा अशी शक्यता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत हजाराच्या आत रुग्णसंख्या असताना शुक्रवारी १०३१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवाळीनंतर महापालिकेनं मुंबईतील चाचण्यांची संख्याही वाढवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी १७,३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यातून १०३१ रुग्ण बाधित आढळले आहेत. तसंच, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा १०,६३७ वर गेला आहे. ५५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या ९०४६ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता २९६ दिवसांवर घसरला आहे.

राज्यात ५,६४० नवे रुग्ण

राज्यात ५६४० नवे रुग्ण आढळले असून, १५५ जणांचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार झाली असून, ४६,५११ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर हा २.६३ टक्के आहे. गेल्या २४ तासात ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात नाशिक जिल्हा ३७७, पुणे शहर ३३५, पिंपरी-चिंचवड १६५, उर्वरित पुणे जिल्हा २४८, नागपूर शहर ३७९ नवे रुग्ण आढळले.

देशभरातील बाधितांची संख्या ९० लाखांच्या पुढे

गेल्या २४ तासांत आणखी ४५,८८२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे, देशातील बाधितांची संख्या शुक्रवारी ९० लाखावर पोहोचली. याच वेळी, ८४.२८ लाख लोक बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण ९३.६ टक्क्य़ांवर गेले आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या शुक्रवारी ९०,०४,३६५ इतकी झाली. २४ तासांमध्ये ५८४ लोक कोरोनाला बळी पडल्यामुळे आतापर्यंतची करोनामृत्यूंची संख्या १,३२,१६२ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मृत्यूदर १.४६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. देशात सध्या कीरोना संसर्गाची ४,४३,७९४ सक्रिय प्रकरणे असून, हे प्रमाण एकूण संख्येच्या ४.९२ टक्के इतके आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या