Coronavirus Updates: चिंता नको! कोरोनाबाधीतांचा सगळा खर्च सरकार उचलणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्याच्या घडीला कोरोना संशयितांची (coronavirus) वैद्यकीय चाचणी ६ प्रयोगशाळांच्या (lab) माध्यमातून होत आहे. येत्या २ दिवसांत प्रयोगशाळांची संख्या वाढवून ती १२ वर नेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीतांची (COVID- 19) माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई, पुणे आणि पिंपरीत आणखी कोरोना व्हायरची लागण झालेले ३रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली असल्याचं टोपे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

५ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. कोरोनाची लागण झालेल्या ५ रुग्णांची प्रकृती सुधारली असून या ५ जणांची टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या पाचही रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, या पाचही जणांना होम क्वारंटाईन राहावं लागेल. त्यांच्यावर पुढील १४ दिवस प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

२५०० टेस्टची सुविधा

सुरूवातीच्या टप्प्यात आपल्याकडे केवळ ३  प्रयोगशाळा होत्या. ज्यामध्ये कोरोना संशयितांची टेस्ट व्हायची. ती संख्या वाढवून आपण ६ वर नेली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरी येत्या दोन दिवसांत राज्यात आणखी ६ प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. प्रत्येक प्रयोगशाळेत किमान २५ या तऱ्हेने एकावेळी २५०० टेस्टची सुविधा आपल्याकडे उपलब्ध होईल. 

संपूर्ण खर्च सरकारचा

सध्या कोरोनाग्रस्तांवरील सर्व उपचाराचा भार हा राज्य सरकार उचलत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत तसंची वीमा योजनेअंतर्गत अतिदक्षतेतील रुग्णांचा खर्च सरकार करत आहेत. इथून पुढंही रुग्णांवर उपचाराचा कोणताही खर्च येणार नाही. त्याबद्दल त्यांनी निश्चिंत राहावं, असं आश्वासनही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ला १०० टक्के प्रतिसाद देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या