कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ; भारतात तिसऱ्या लाटेचा धोका?

भारतातील कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या २ दिवसात नवीन रुग्णांमध्ये २१ हजारांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४६३९७ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर यापूर्वी मंगळवारी २५४६७ नवीन रुग्ण नोंदवण्यात आले होते. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये, देशभरात कोरोनाचे ४६३९७ नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत, तर या काळात ६०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशात संक्रमित लोकांची संख्या ३ कोटी २५ लाख ५७ हजार ७६७ वर गेली आहे आणि ४ लाख ३६ हजार ३९६ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३४४२० लोक बरे झाले आहेत, त्यानंतर बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी १७ लाख ८१ हजार ४६ पर्यंत वाढली आहे आणि 3 लाख ४० हजार ३२५ लोकांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २ दिवसांत भारतात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे आणि नवीन रुग्ण जवळजवळ दुप्पट झाली आहेत. भारतात २४ ऑगस्ट रोजी देशभरात २५४६७ नवीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत, जे  २६ ऑगस्ट रोजी आलेल्या आकडेवारीपेक्षा २०९३० कमी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना विषाणूचे नवीन रुग्ण बुधवारी २५ ऑगस्ट ३७५९३पर्यंत वाढले होते आणि नवीन रुग्ण ४६३९७ वर पोहोचले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे ५९ कोटी ५५ लाख ४ हजार ५९३ डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतात ४६ कोटी ८ लाख २ हजार ७८३ लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर १३ कोटी ४७ लाख १ हजार ८१० लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या