भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

एसबीआय रिसर्चच्या अहवालात ऑगस्टपर्यंत तिसर्‍या लाटेचा दावा करण्यात आला आहे. कोविड -19 : द रेस टू फिनिशिंग लाइन या नावानं प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असं म्हटलं आहे की, तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल.

कोरोनाच्या स्थितीवर एसबीआय रिसर्च रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं होतं की, दुसर्‍या लाटेचा पीक मेच्या तिसर्‍या आठवड्यात येईल. ६ मे रोजी भारतात संसर्गाची सुमारे ४ लाख १४ हजार नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली होती.

महामारी दरम्यान एका दिवसात संक्रमित होण्याची ही सर्वाधिक संख्या होती. या काळात दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळसारख्या बड्या राज्यांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अहवालानुसार, तिसऱ्या लाटेचा पीक दुसर्‍या लाटेपेक्षा दुप्पट किंवा १.७ पट जास्त असेल.

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा कहर कमी झाला आहे, पण कोरोना अद्याप संपलेला नाही. संसर्गामुळे दररोज शेकडो लोक आपला जीव गमावत आहेत. रविवारी संसर्गामुळे ७२५ लोकांचा मृत्यू झाला. परंतु ८८ दिवसांमध्ये हे आकडे सर्वात कमी आहेत. यापूर्वी ७ एप्रिल रोजी ६८४ लोकांचा मृत्यू झाला होता.

रविवारी देशात १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १० पेक्षाही कमी लोकांचा मृत्यू झाला. तर ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.

कोरोना संक्रमणाचा अंदाज घेण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीने गेल्या वर्षी कोरोना संक्रमण प्रकरणांचा अंदाज लावण्यासाठी एक पॅनलची स्थापना केली होती. हे पॅनेल मॅथमेटिकल मॉडलच्या माध्यमातून अंदाज लावते.

आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पॅनेलचा अंदाज आहे की, जर कोविड प्रोटोकॉलचे योग्य प्रकारे पालन केलं नाही तर अक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट आपल्या पीकवर असू शकते. तर वैज्ञानिकांचे असेही मत आहे की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये दररोज येणाऱ्या नवीन प्रकरणांची संख्या अर्धी असू शकते.


पुढील बातमी
इतर बातम्या