जम्बो कोविड सेंटर ३१ मार्चपर्यंत सुरूच राहणार!

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)नं Covid 19 रुग्णांसाठीची जंबो सुविधा ३१ मार्चपर्यंत कार्यरत ठेवण्याची योजना आखत आहे.

वृत्तानुसार, हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. कारण केंद्र सरकार ब्रिटनहून येणारी उड्डाणं वाढवत आहे. ज्यामुळे COVID 19 च्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. शिवाय, मुंबई दर आठवड्यात यूकेकडून किमान पाच उड्डाणं भारतात येत आहेत.

याव्यतिरिक्त, मुंबईच्या सात जंबो सुविधांमध्ये, पुढील दोन महिन्यांपर्यंत पालिकेद्वारे चालवण्यात येणाऱ्या काही रूग्णालयांसह कोरोनाव्हायरस ग्रस्त रूग्णांसाठी ८००० बेड राखीव ठेवले जातील. आतापर्यंत ७५ टक्के बेड रिक्त आहेत.

गुरुवारी २८ जानेवारी रोजी मुंबईत ५ हजार ५२१ सक्रिय संक्रमित covid रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार २७१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ५२५ रुग्ण गंभीर आहेत. सध्या, १३ हजार ५०० हून अधिक बेड कार्यरत आहेत. १३ हजार ५०० पैकी ८००० बेड जंबो सुविधांमध्ये आहेत. खासगी रुग्णालयात ४००० आणि पालिका रुग्णालयात ४००० बेड आहेत.

तथापि, सध्या भारत दररोज सुमारे चार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करत आहे. परंतु जुलै महिन्यात सरकार ३० कोटी लोकांना लसी देण्याची योजना आखत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला दोन डोस आवश्यक आहेत म्हणजेच आतापासून दररोज सुमारे ३० लाख लोकांना लसीकरण करणं आवश्यक आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम

लॉकडाऊनमुळं अनेक जणांना मानसिक तणाव

पुढील बातमी
इतर बातम्या