बूरमध्ये डेंग्यू, मलेरियाचे थैमान

 चेंबूर - चेंबूरच्या अनेक भागामध्ये सध्या डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आजार नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चेंबूरमधील कोकणनगर, सिद्धार्थ कॉलनी, महात्मा फुले नगर, सिंधी कॅम्प, लालडोंगर, गुलशन बाग, घाटला, खारदेव नगर, पी. वाय. थोरात मार्ग, माहुल गाव, टिळकनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार वसाहत इमारती या परिसरात सध्या तापसरीने ठाण मांडला आहे. हा सर्व परिसर झोपडपट्टीचा असून, पावसाळ्यात सतत पाणी साचत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या परिसरातील नागरिकांना सतत साथीच्या रोगाला बळी पडावे लागत आहे. त्यातच स्थानिक नगरसेवकांकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने राहिवाशामध्ये संतापाची भावना आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या