धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

धारावीमध्ये रविवारी कोरोनाचे केवळ ५ नवीन रुग्ण सापडले आहेत. धारावीतील कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र, दादर-माहीममधील रुग्णसंख्या काहीशी वाढताना दिसत आहे. दादरमध्ये रविवारी ३१ तर माहीममध्ये १७ नवीन रुग्ण आढळले आहेत.

जी उत्तर विभागात धारावी, माहीम, दादर या विभागांचा समावेश होतो. धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. मात्र, ‘मिशन धारावी’मुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममधील रुग्णसंख्या वाढत आहे. जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ६४९२ वर पोहोचली आहे. 

धारावीत आता ८८ अॅक्टिव्ह रूग्ण, दादर येथे ४५८, तर माहीम येथे २७२ अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. मिशन धारावीमध्ये धारावीतल्या हजारो लोकांची टेस्ट करण्यात आली. आणि लक्षणे आढळलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं.  महापालिकेने धडक उपाय योजना केल्याने हे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.    


हेही वाचा

अरे बापरे ! राज्यात तासात ३९० जणांचा कोरोनाने मृत्यू, १२ हजार २४८ नवे रुग्ण

मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या