नवी मुंबईत कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी १०८६ दिवसांवर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. नवी मुंबईतही दैनंदिन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी वाढला आहे. ८० दिवसांपर्यंत खाली आलेला रुग्णदुपटीचा कालावधी आता तब्बल १०८६ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. 

नवी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारी २०२१ मध्ये ७३५ दिवसांवर गेला होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्याने हा कालावधी ८० दिवसांवर आला होता.  त्यानंतर नवी मुंबई महापालिकेकडून लागू करण्यात आलेले निर्बंध व उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आली. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

१५ जानेवारी  -  ६३४ दिवस

२ फेब्रुवारी  -    ७३५ दिवस

१६ फेब्रुवारी -  ५८१ दिवस

१ मार्च -  ३७५ दिवस

१ एप्रिल -  ८० दिवस

५ मे -  १९० दिवस

१ जून -  ८१६ दिवस

२८ जुलै -  १०८६ दिवस

पुढील बातमी
इतर बातम्या