लहान मुलांच्या आरोग्यासाठी तेंडुलकरांची 'बॅटिंग'!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

लहानग्यांची जीवनपद्धती कशी असावी? आणि पालकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? यावर आधारीत 'इव्हन व्हेन देअर इज ए डॉक्टर’ या पुस्तकाचं प्रकाशन गुरुवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

लेखक डॉ. यशवंत आमडेकर यांनी डॉ. राजेश चोखानी आणि कृष्णन सिवारामाकृष्णन यांच्या सहकार्याने लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये पार पडला.

काय म्हणाले सचिन, अंजली..

मला अत्यंत संतुलित कुटुंब लाभले आहे. माझे वडील हे शांत स्वभावाचे होते. वडिलांप्रमाणेच आईचाही स्वभाव शांतच आहे. माझ्या आई-वडिलांनी स्वातंत्र्य दिले, पण अतिलाड केले नाहीत, असं सचिन यावेळी म्हणाला. तर डॉ. आमडेकर हे माझे गुरू होते आणि आजही आहेत, असं मनोगत डॉ. अंजली तेंडुलकर यांनी व्यक्त केलं.

सकारात्मक बदल घडविण्यासाठी पालक आणि डॉक्टरांनी एकत्रित पाऊल उचलणं आवश्यक आहे. मुले आजारी पडू नयेत यासाठी त्यांचं आरोग्य कसं चांगलं राखता येईल? आणि मुलं आजारी पडली, तर छोट्या-मोठ्या आजारपणात त्यांची काळजी कशी घ्यावी? हे शिकणं कोणत्याही आई-वडिलांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. डॉक्टरांनी पालकांना ही माहिती देऊन त्यांना सक्षम करणंही आवश्यक आहे.

डॉ. वाय. के. आमडेकर, वरीष्ठ बालरोगतज्ज्ञ, वाडिया रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या