शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दृष्टीदोष शिबीर

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

घाटकोपर - शाळेतल्या विद्यार्थ्यांमधील वाढत्या दृष्टीदोषामुळे शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग चेंबूर यांच्या वतीने दिव्यांग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्यानुसार 6 डिसेंबरला एन वॉर्डमधील सर्व शाळेतल्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'दृष्टीदोष' या शिबिराचं आयोजन केलं. पंतनगर येथील वनिता विकास मंडळ संचलित, शिशू विकास प्राथमिक विद्यालयात हे शिबीर घेण्यात आलं. या सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमध्ये दिव्यांग सप्ताह आयोजित केला गेला. या शिबिरात आतापर्यंत 150 मुलांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरात ज्या मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला अशा मुलांना दोन महिन्यात मोफत चष्मा देण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या