लसीकरण न झालेल्या नागरिकांवर निर्बंध लागणार

ओमिक्रॉनच्या भितीमुळे, महाराष्ट्र राज्य सरकार कोरोनाव्हायरस (COVID-19) विरूद्ध पूर्णपणे लसीकरण न केलेल्या नागरिकांवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहे.

अहवालानुसार, ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांना राज्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल आणि त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल.

याबाबतचा अहवाल फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

असं म्हटलं जात आहे की, राज्यातील १.७५ कोटींहून अधिक नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही आणि त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढला आहे.

याबाबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

दोन्ही लसी न मिळाल्यास, व्यक्तींना अतिरिक्त निर्बंधांना सामोरे जावे लागेल, कारण निवडकपणे निर्बंध लादले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.

फ्री प्रेस जर्नलशी केलेल्या संभाषणात, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सर्व पात्र नागरिकांनी व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आणि लसीकरण न करणे हा पर्याय नाही. त्याला बळकटी देण्यासाठी, सरकार काही निर्बंधांवर निर्णय घेत आहे, ज्यामुळे राज्यातील त्यांच्या क्रियाकलापांवर मर्यादा येतील. निर्देशानुसार नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच कठोर पावले उचलली जातील.

राज्याच्या आरोग्य विभागानं, गेल्या अनेक महिन्यांपासून, नागरिकांसाठी लसी मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि पुरेसे डोस उपलब्ध असल्यानं, ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी लसीकरण करण्याचे आवाहन केलं आहे.

१२.०३ कोटी लसीकरण झालेल्यांपैकी फक्त ४.३७ कोटी लोकांनी त्यांचा दुसरा डोस घेतला आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. याचा अर्थ असा होतो की ७ कोटींहून अधिक लोकांनी केवळ लसीचा पहिला डोस घेतला आहे.

एका वरिष्ठ अधिकार्‍याचा हवाल्यानुसार, “सरकार जिल्हा प्रशासनाला मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये दुसरा डोस न घेतलेल्या लोकांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यास सांगू शकते.

याशिवाय, जिल्हा प्रशासन रेशन दुकाने, गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांना फक्त त्या लोकांनाच किराणा सामान आणि इंधन पुरवण्याचे निर्देश देऊ शकते ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे.” 

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुष्टी केली आहे की ओमिक्रॉनच्या भीतीवर कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत, तथापि, सरकारनं नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी कोविड-19 सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

भारतात प्रवेश केलेल्या आणि कोविड-19 ची लागण झालेल्या काही आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

यापूर्वी 8 डिसेंबर 2021 रोजी डोंबिवलीत दाखल झालेल्या एका 33 वर्षीय प्रवाशाला ओमिक्रॉन संसर्गाचा संशय आला होता. तथापि, नकारात्मक अहवालानंतर, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि कोविड संसर्गामुळे त्याला आणखी काही दिवस वेगळे ठेवण्यास सांगण्यात आले. 

पुढील बातमी
इतर बातम्या