मुंबई विमानतळावर होणार जलद कोरोना चाचणी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) उतरणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निकाल जलद मिळणे शक्य होणार आहे. विमानतळ प्रशासनानं यासाठी पुण्याच्या माय लॅब डिस्कवरी सोल्युशन्स या संदर्भात करार केला आहे. या सुविधेमुळं विमानतळावर चाचणीच्या निकालासाठी प्रवाशांना अडकून राहावं लागणार नाही, तसेच विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

विमानतळ प्रशासनानं मायलाब डिस्कवरी सोल्यूशन्सला आरटी-पीसीआर चाचणीसाठी काउंटर उभारण्याासाठी आणि नमुने तपासणीसाठी जागा दिली आहे. या अंतर्गत प्रवाशांची कोरोना चाचणी केल्यानंतर  काही तासात  प्रवाशांना कोरोना चाचणीचा निकाल मिळणार आहे. यासाठी आंतराष्ट्रीय आणि आंतरदेशीय प्रवाशांसाठी काऊंटर उघडण्यात आलं आहे.

२२ फेब्रुवारीपासून मायलाब डिस्कवरी सोल्यूशन्सने ही सुविधा सुरू केली आहे. चाचणीसाठी ८५० रुपये असा दर ठेवण्यात आला असून, आठ तासात प्रवाशांना निकाल देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे. सध्या विमानतळावर तीन खासगी कंपन्यांनी कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये मेट्रोपॉलिस हेल्थकेअर, सबअर्बन डायग्नोस्टिक्स आणि लाईफीनीटी वेलनेस या कंपन्यांच्या टेस्टिग सुविधा आहेत.

या तिन्ही कंपन्यांनी प्रवाशांच्या चाचणीसाठी ३० काऊंटर उभारली आहे. यामध्ये आंतराष्ट्रीय प्रवाशांसाठी १२ तर आंतरदेशीय प्रवाशांसाठी १८ काऊंटर उभारण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना जलद कोरोना चाचणीसाठी ४५०० रुपये मोजावे लागतात. मात्र ही चाचणी अचूक आणि जलद आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या