खोट्या जाहिरातींपासून सावधान !

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई - फक्त 5 हजार रुपये खर्च करा आणि बारीक व्हा, तीन आठवड्यात उंची वाढवा, शक्तीवर्धक औषधं घेऊन तुमची सेक्स पॉवर वाढवा. तुम्ही पण घेतली आहेत का? अशी औषधं, अशा जाहिरातींपासून सावधान राहा. नाहीतर करायला जाल एक, होईल भलतंच.फसव्या जाहिराती दाखवून बनावट उत्पादनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारलाय. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या जाहिरातींच्या मोहात पडू नये. तसेच नकली उत्पादने नजरेस पडतील तर नागरिकांनी थेट एफडीएच्या 022-6592363 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन एफडीएने केलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या