चेंबूर वसतिगृहाच्या स्वयंपाकघराची एफडीएकडून तपासणी

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

चेंबूर - चेंबूरमधील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील मेसच्या जेवणात रविवारी पाल आढळून आली. त्यामुळे मेस, स्वयंपाकघरात अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता एफडीएकडून (अन्न व औषध प्रशासन) कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार अन्न निरीक्षकांकडून मेसची, स्वयंपाकघराची तपासणी करण्यात येणार आहे. तर कंत्राटदाराचीही चौकशी करण्यात येणार असून या तपासणीत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यास कायदेशिर कारवाई करू अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई सुरेश अन्नपुरे यांनी दिली.

या प्रकरणाची सामाजिक न्याय मंत्र्यांनी गंभीर दखल घेत कंत्राटदारांची हकालपट्टी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर गृहपालांसह इतर संबंधितावरही कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

आधीच्या बातमीसाठी इथे क्लिक करा - https://www.mumbailive.com/hi/around-you/dead-lizard-in-hostel-mess-lunch-7787

पुढील बातमी
इतर बातम्या