महाआरोग्य शिबिर

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

दिंडोशी - दिंडोशीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत सध्या डेंग्यू ,मलेरियासारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर आणि विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका मनीषा पाटील यांच्या प्रयत्नाने केईएम हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्टर्न ईलाइट यांच्या सहकार्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसंच डेंग्यू, मलेरिया, हिवताप, काविळ, मधुमेहसारख्या आजारांची तपासणी आणि उपचारांबरोबरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मेवाटपाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना पत्रकेही वाटण्यात आली. या शिबिरात तेरणा कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी महिला विभाग संघटिका अनघा साळकर, पूजा चव्हाण, नगरसेवक प्रशांत कदम, सदाशिव पाटील, सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव, महिला शाखा संघटक वैभवी पाटील, शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस खालीद खान यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या