देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. याचाच प्रत्यय नुकताच मुंबईच्या वाडिया रुग्णालयात पहायला मिळाला. कल्याणमध्ये राहणाऱ्या चार महिन्याच्या विदिशाचं १४ मार्चला हार्टचं गुंतागुंतीचं असं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर तिला तब्बल ६ वेळा हार्ट अॅटॅक आला. तरी देखील ती आता सुखरूप आहे. खरंतर हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. परळच्या वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्या चिमुरडीचा जीव वाचला. ती आता पूर्णपणे बरी झाली असून, शुक्रवारी सकाळी तिला घरी सोडण्यात आले.
तसेच, तिच्या उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याने फुप्फुसांच्या कार्यातही दोष निर्माण झाला होता. डॉ. पांडा यांनी सांगितले की, तिच्या हृदयावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला तब्बल 12 तास लागले. त्यानंतर आॅक्सिजनची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी तिला ‘हाय फ्रिक्वेन्सी आॅसिल्लोट्री’ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिच्या फुप्फुसाचा त्रास कमी झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर काढण्यात आले.