शासकीय दंत महाविद्यालयातर्फे मोफत शिबीर

तोंडाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे? किंवा त्याची कशी काळजी घ्यावी? याबाबत लोकांमध्ये जागृती नसते. त्यामुळे मुख कर्करोगांसारखे आजार आपल्याला होऊ शकतात. यावर मार्गदर्शन करण्यासाठी सीएसएमटी येथील शासकीय दंत महाविद्यालयातर्फे मंगळवारी स्वच्छ मुख या अभियानातंर्गत मोफत दंत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

158 रुग्णांची तपासणी

शिबिरादरम्यान, ओपीडीमध्ये एकूण 158 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 91 रुग्णांवर दातांसाठी उपचार करण्यात आले आणि 73 रुग्णांच्या दातांची क्लिनिंग करण्यात आली. तर, 18 रुग्णांच्या दातांची फिलिंग करण्यात आली.

लोक आपल्या मुख आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तोंडाचं आजार बऱ्याचदा वाढतो. शिवाय, ब्रश करूनही अनेकांचे दात किडतात. त्यामुळे दात दुखण्याचा आजार होतो. याच कारणास्तव आम्ही हे मोफत शिबीर राबवण्याचा निर्णय घेतला. त्यात भरपूर जणांनी आपला सहभाग नोंदवला. दातांच्या तपासणीसोबत त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत. ज्यांना पुढचे उपचार करायचे असतील त्यांना तसं सांगण्यातही आलं आहे. 

- डॉ. मानसिंग पवार, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय

पुढील बातमी
इतर बातम्या