मोफत फिरती वैद्यकीय सेवा

  • विलास तायशेटे & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

चेंबूर - राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या संस्थेच्या वतीनं मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. शिबिरात साथीचे आजार, सर्दी, खोकला, ताप, अस्थमा, मधूमेह, रक्तदाब या आजारांची तपासणी केली जातेय. या शिबिरादरम्यान रुग्णांना मोफत औषधेही देण्यात येत आहेत. त्यासाठी एमबीबीएस डॉक्टर तसंच औषधं गोळ्या देण्यासाठी बी.फार्म. झालेला कंपाउंडरही ठेवण्यात आले आहेत. या सर्वांचे व्यवस्थापन व्होकार्ड ही संस्था करत आहे. संपूर्ण चेंबूरमध्ये वारानुसार ही गाडी, नागाबाबा नगर, अयोध्या नगर, विष्णू नगर, भारत नगर, वाशीनाका आदी ठिकाण फिरते, अशी माहिती डॉ. रमेश कानडे आणि कंपाउंडर दिनेश बोरखेडे यांनी सागितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या