डेंग्यूमुळे वाढला 'ड्रॅगन'चा 'भाव'

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

बोरिवली - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने घबराट पसरली आहे. या रोगात कमी होणाऱ्या प्लेटलेटवर पपईच्या रसाच्या गोळ्या, ड्रॅगन फ्रूट आणि किवी फळे गुणकारी असल्याचा समज पसरला आहे. त्यामुळे ही फळे आणि गोळ्या यांची विक्री वाढत आहे. मात्र त्यांच्या सेवनाने प्लेटलेट वाढत असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्लेटलेट वाढवण्यासाठी अनेकदा डॉक्टरच पपईच्या पानांच्या रसाच्या गोळ्या पर्यायी औषधे लिहून देतात. चार-पाच कंपन्यांनी पपईच्या पानांच्या रसाच्या गोळ्या बाजारात आणल्या असून त्यांची किंमत २४० ते ४१० रुपयांपर्यंत असून दिवसाला किमान तीन हजार गोळ्यांची पाकिटे विकली जात आहे. त्यामुळे हाँगकाँगहून येणारे ड्रॅगन फ्रूट आणि न्यूझीलंडहून येणारे किवी या फळांच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले. तसेच काही महिन्यांपूर्वी 250 अडीचशे रुपये किलो असलेल्या ड्रॅगन फ्रूटचा भाव आता चारशे रुपये किलो झाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या