घरबसल्या 1 रुपयात उपचार

'वन रुपी' क्लिनिक द्वारे आता नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे. यासाठी फक्त नागरिकांना या क्लिनिकच्या हेल्पलाईन नंबर वर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. या फोनद्वारे अवघ्या 10 मिनिटांत डॉक्टरांची टीम त्या संबधित व्यक्तीच्या घरी दाखल होईल. खासगी रुग्णालय असो किंवा सरकारी रुग्णालय असो, सध्या रुग्णाला वैद्यकीय तपासण्या, उपचार करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यासाठीच 10 मे ला मुंबईतील रेल्वे स्थानकात 'वन रुपी' क्लिनिक सुरू करण्यात आले. आतापर्यंत या क्लिनिक सेवेचा जवळपास 2 हजाराहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. पण, अजूनही या क्लिनिकपर्यंत काही लोक पोहचू शकले नाहीत. याच रुग्णांना घरपोच वैद्यकीय उपचार मिळावेत या हेतूने ही वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे.

'वन रुपी' क्लिनिकची घरबसल्या वैद्यकीय सेवा हवी असल्यास नागरिकांना 08030636166 या हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर क्लीनिकमधील ऑपरेटर फोन आलेल्या क्रमांकावर पुन्हा फोन करून संबंधित रुग्णाचे नाव आणि पत्ता नोंद करून घेईल. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटात रेल्वे स्टेशनजवळील क्लिनिकचे डॉक्टर आणि एक परिचारिका रुग्णाच्या घरी दाखल होतील, अशी माहिती 'वन रुपी' क्लिनिक चे संस्थापक डॉक्टर राहुल घुले यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या