रेल्वे प्रवाशांना 'गोल्डन' सुविधा, वन रुपी क्लिनिक देणार मेंबरशीप कार्ड

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वन रुपी क्लिनिकने प्रवाशांच्या संपूर्ण कुटुंबीयांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा म्हणून 'गोल्ड मेंबरशीप कार्ड' देण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १ जानेवारीपासून 'वन रुपी क्लिनिक' रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'गोल्ड मेंबरशीप कार्ड' लॉन्च करणार आहे. या मेंबरशीप कार्ड अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना अगदी स्वस्त दरात 'वन रुपी क्लिनिक'तर्फे सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या करुन घेता येणार आहेत. या मेंबरशीप कार्डसाठी वर्षाला फक्त १०० रुपये भरावे लागणार आहेत.

गोल्ड मेंबरशीप कार्डचे दर खालीलप्रमाणे-

चाचणी

शुल्क

सीबीसी
६० रुपये
ब्लड शुगर
१० रुपये
सिरम कोलेस्ट्रॉल
२५ रुपये
सिरम बिलूरुबिन
२५ रुपये
थायरॉईड टेस्ट
१९९ रुपये
सिरम क्रिएटानाइन
५० रुपये 
सिरम युरिया
५० रुपये
डेंग्यू एन एस १
२०० रुपये
एचआयव्ही
२०० रुपये
मलेरिया
१०० रुपये
टायफॉईड

१०० रुपये

सिरम कॅल्शिअम

५० रुपये

एच बी

२०० रुपये

वैद्यकीय इतिहासात पहिल्यादांच एवढ्या कमी किंमतीत रक्त चाचण्या करुन मिळणार आहेत. वर्षाला फक्त १०० रुपये मेंबरशी घेण्यात येईल. रुग्णालयात डेंग्यूची चाचणी करायची असल्यास कमीत कमी ६०० रुपये मोजावे लागतात पण, आम्ही कमी किंमतीत चाचणी उपलब्ध करुन देणार आहोत.

- राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक

पुढील बातमी
इतर बातम्या