नंदुरबार आणि पालघरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकार नंदुरबार आणि पालघर या दुर्गम भागात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्य सरकारने निवडलेल्या नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीसाठी राज्य सरकारला आशियाई विकास बँकेकडून 4100 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या रुग्णालयांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

४३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर दोन वर्षांनी शासकीय वैद्यकीय विद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाकडे अर्ज सादर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी सुसज्ज रुग्णालय मिळणार असल्याने रुग्णांची फरपट थांबवण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाकरिता आवश्यक जमीन महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात राज्य मंडळाने मान्यता दिली.

पालघर येथे सिडकोने दिलेल्या दहा एकर भूखंडामध्ये २०० खाटांचे रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी २०९ कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित २३० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी व संलग्न प्रशासकीय इमारत, अधिकारी कर्मचारी आवास व विद्यार्थी वसतिगृहासाठी एकूण २५ एकर जागेची आवश्यकता आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात अतिरिक्त पंधरा एकर जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१७ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. इमारत आणि बांधकामासह अन्य खर्च धरून प्रत्येक महाविद्यालयासाठी ४८५ कोटी रुपयांचा सरकारने तात्त्विक मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे.


हेही वाचा

कच्चा रस्ता, रुग्णालयात डॉक्टर नाही, अखेर गरोदर महिलेने प्राण सोडले

पुढील बातमी
इतर बातम्या