लठ्ठपणाला म्हणा बाय

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई - महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात एकाच वेळी लठ्ठपणा निवारक दवाखाने सुरू करुन येथे आलेल्या रुग्णांना एकाच वेळी त्यांच्या लठ्ठपणाबाबतच्या शंकेचं निवरण करण्यात येईल, असं वक्तव्य आरोग्यमंत्री गिरीश बापट यांनी जे जे रुग्णालयात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लठ्ठपणा जागृती अभियानात केलं. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग आणि जेटी फाउंडेशन यांच्या वतीने मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरिय लठ्ठपणा जागृती अभियानाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

महिनाभर सुरू राहणाऱ्या या अभियानाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत लठ्ठपणाबाबतच्या कारणांबद्दल जागृती व्हावी आणि भविष्यातील आजार टाळता यावेत हा या अभियानाचा उद्देश असल्याचं जेटी फाउंडेशनच्या डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या