घाटकोपरमध्ये आरोग्य शिबीर

घाटकोपर - एस.के.फ्रेंड सर्कलच्या वतीने सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 9 ते 4 या वेळेत घाटकोपरमधील भटवाडी येथील पार्सेकर चौकात हे आरोग्य शिबीर संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, अॅन्जिओप्लास्टी, किडनी, रक्तदाब, डोळे, ईसीजी आणि कॅन्सर या सर्व आजारांची तपासणी आणि उपचारदेखील यावेळी करण्यात आले.

यावेळी अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराचा 200 जणांनी लाभ घेतला. यावेळी ज्या व्यक्तींनी मोफत आरोग्य तपासणी केली त्या सर्वांना तुळशीचे रोपटे देण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या