निपाह व्हायरसमुळे मुंबईसह पुण्यात अलर्ट

  • मुंबई लाइव्ह टीम & मानसी बेंडके
  • आरोग्य

'निपाह' या व्हारसने सध्या केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. वटवाघुळाच्या संक्रमणातून पसरणाऱ्या या अत्यंत घातक व्हायरसमुळे केरळमध्ये अनेकांचा जीव घेतला आहे.  चिंतेची बाब म्हणजे या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही. त्यामुळे भारतात 'निपाह' व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहीलं आहे

केरळच्या कोझीकोडेमध्ये 'निपाह' या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून या व्हायरसची लागण झालेल्या अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारनं याप्रकरणी दखल घेतली आहे. केरळमध्ये डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.  

डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संस्थेने 'निपाह' व्हायरसमुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला आहे. पुण्यातल्या नॅशनल इंस्टिस्ट्युट ऑफ वायरॉलॉजीनं ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर निपाह व्हायरस असल्याची घोषणा केली आहे.  त्यामुळे पुणे, मुंबईसह भारतभर खबरदारी घेण्यात येत आहे.  

निपाह नाव कसे पडलं?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. १९९८ साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला 'निपाह' असं नाव देण्यात आलं. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता.२००४ मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यावेळी तिथल्या लोकांनी खजूराच्या झाडापासून मिळणारा द्रवपदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होतं. भारतातल्या केरळमध्ये प्रथमच 'निपाह' विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे

लक्षण काय ?

  • निपाह व्हायरस हा हवेतून पसरत नाही
  •  थेट संसर्ग झालेली व्यक्ती, प्राण्याच्या संपर्कात आल्यास निपाह होऊ शकतो 
  • निपाह व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो.
  •  ताप, थकवा,बेशुद्धावस्था, श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं आढळतात
  • ताप,थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, मळमळ, अस्वस्थ वाटणं ही लक्षणं ७ ते १० दिवस आढळतात

  • वरील लक्षणं आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४-४८ तासांमध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता 

  • अनेक रुग्णांमध्ये मेंदूशी निगडीतश्वासोश्वासाशी निगडीत आणि हृदयाच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.

कशी कळाजी घ्याल ?

  • निपाह व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सध्या कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही
  • पडलेली फळ, प्रामुख्यानं खजुराची फळं खाणं टाळा, कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस होऊ शकतो
  • संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा

  • वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रुग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे
  •  ग्लोव्हस किंवा मास्क घालून डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करावी   
पुढील बातमी
इतर बातम्या