'या' बाबतीत भारताची चीनला धोबीपछाड

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्माच्या बाबतीत भारतानं पहिला नंबर पटकावला आहे. नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात ६७ हजार ३८५ बालकांनी जन्म घेतला. जन्म घेतलेल्या बालकांची संख्या भारतात अधिक आहे. याबाबतीत तर भारतानं चीनला मागे टाकलं आहे. तर चीनचा दुसरा, नायजेरीया तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या, इंडोनेशिया पाचव्या आणि अमेरिका सहाव्या स्थानावर आहे

'ही' आहे आकडेवारी

जगभरातल्या बालकांची संख्या विचारात घेता भारतात जन्माला आलेल्या बालकांची संख्या १७ टक्के इतकी आहे. १ जानेवारी या दिवशी भारतात नव वर्षाचे स्वागत होत असताना ६७, ३८५ बालकांनी जन्म घेतला. चीनमध्ये ४६ हजार २२९ बालकांनी तर नायजेरियात २६ हजार ०३९ बालकांनी, पाकिस्तानात १३ हजार ०२० बालकांनी, इंडोनेशियात १३ हजार ०२० बालकांनी, अमेरिकेत १० हजार ४५२ बालकांनी जन्म घेतला. युनीसेफनं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

पहिला जन्म फिजीत

जगात पहिल्या बालकाचा जन्म फिजी देशात झाला. १ जानेवारीला शेवटच्या जन्माची अमेरिकेच्या नावे नोंद झाली आहे. १ जानेवारी याच दिवशी जन्म व्हावा यासाठी सिझेरियनद्वारे अनेक महिलांनी बालकांना जन्म दिला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या