जागतिक योग दिन: अभिनेत्री प्राजक्ता माळी घालणार १०८ सुर्यनमस्कार

सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर जागतिक योगा दिन आपल्या प्रशिक्षणार्थीसोबत १०८ सुर्यनमस्कार घालून साजरा करणार आहे. कोरोना व्हायसरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ६ वा योग दिन हा व्हर्च्युअली साजरा होणार असल्याने ‘घरीच आणि घरच्यांसोबत योगा ’ ह्या थीमनूसार योगा दिवस साजरा होणार आहे. त्यामुळं रीमानं सर्वांना व्हर्च्युअली एकत्र आणून योगा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अष्टांग योगा शिकवणाऱ्या रीमा वेंगुर्लेकरकडं अनेक मराठी कलाकार योगाचं प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. अमृता खानविलकर, सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, सिध्दार्थ मेनन, सायली संजीव, संजय जाधव, ऋता दुर्गुळे असे मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका तिचे शिष्य आहेत. यापैकी प्राजक्ता माळीनं आपल्या योगा गुरू सोबत योगदिनी या अनोख्या उपक्रमात सामिल व्हायचं ठरवलं आहे.

'अष्टांग योगामधला तुम्हांला सर्वाधिक लाभ देणारा व्यायामप्रकार म्हणजे सुर्यनमस्कार. सुर्यनमस्कार करणं हे बाकी योगाप्रकारापेक्षा सोप असतं. नियमीत योगा न करणारे देखील हा व्यायाम करू शकतात. त्यामुळं सकाळी ८ वाजता आम्ही १०८ सुर्यनमस्कार घालणार आहोत', असं रीमा वेंगुर्लेकर यांनी म्हटलं.

३ वर्ष अष्टांग योगा ट्रेनर

योग फक्त तुमच्या शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही कसा परिणामकारक ठरतो, याची 'सक्सेस स्टोरी' आहे अभिनेत्री दिप्ती देवी. अभिनेत्री दिप्ती देवी गेली ३ वर्ष अष्टांग योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकरकडे जाऊन योगाभ्यास करत आहे. योगामूळं तिने आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात केल्याचं तिने नुकतंच २१ जूनला साजरा होणाऱ्या, आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना म्हटलं आहे.

'३ वर्षापूर्वी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नव्हते. पॅनिक अटॅक्स, चिंंता, नैराश्यग्रस्त मनस्थितीचा माझ्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. पण मी रीमाला भेटल्यावर तिने योगाभ्यासाव्दारे माझ्यात शारीरिक-मानसिकदृष्ट्या खूप सकारात्मक बदल घडवून आणले', असं अभिनेत्री दिप्ती देवी यांनी म्हटलं.

'दिप्तीचा योगा क्लासमधला पहिला दिवस मला आजही आठवतो आहे. तिथपासून आजपर्यंतचा तिचा योगाभ्यातला प्रवास सोप्पा नव्हता. आरोग्यविषयक तक्रारींशिवाय तिच्या शरीरात लवचिकता अजिबात नव्हती. पण तिने स्वत:वर मेहनत घेतली. त्यामूळे सकारात्मक बदलांकडे आपोआपच तिची वाटचाल सुरू झाली. खरं तर ३ महिन्यांच्या कालावधीतच तिच्यातले बदल हळूहळू दिसू लागले होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक ‘बॅड फेज’ किंवा ‘लो फेज’ येते. पण त्यावर मात करून तुम्ही सशक्तपणे कसे उभे राहू शकता, हे नियमीत योगाभ्यास करून दिप्तीने दाखवलंय. ती माझी विद्यार्थीने असल्याचा मला अभिमान आहे', असं अभिनेत्री दिप्तीच्या ट्रेनिंगबाबत योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकर यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या