वैद्यकीय मदतीसाठी जन कोविड हेल्पलाइन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असताना वैद्यकीय मदत मिळवणं हे मोठं आव्हान आहे. या उपक्रमामुळं, कोरोनाच्या संबंधितच्या शंका, लक्षणं, जवळच्या चाचणी केंद्राचा किंवा सरकारी रुग्णालयाचा तपशील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसंच ताण, चिंता किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे पीडित लोकांना मदत केली जाणार आहे.

फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या लुपिन लिमिटेडनं (लुपिन) मुंबईतील रहिवाशांसाठी ‘मन का स्वास्थ्य, तन की सुरक्षा’ या अंतर्गत ‘जन कोविड’ हेल्पलाइन (1800-572-6130) सुरू केल्याचं जाहीर केले आहे. जनरल फिजिशिअन, मानसशास्त्रज्ञ, रेस्पिरेटरी फिजिशिअन व सायकॉलॉजिस्ट यांच्या टीमची मदत असणारी ही हेल्पलाइन मोफत सल्लासेवा देणार आहे आणि कोविड-19विषयी शंकांची उत्तरे देणार आहे. ही सेवा मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या भाषांमध्ये दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहे.

सध्या लॉकडाउन सुरू असल्यानं अनेकांना डॉक्टरना भेटण्यासाठी किंवा स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या आरोग्याविषयी शंका दूर करण्यासाठी घराबाहेर जाणं शक्य नाही. त्यामुळं त्यांचा ताण वाढतो आहे. याकरीता मुंबईतील रहिवाशांसाठी ही हेल्पलाइन सुरू करून, कोविड-19शी लढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. जन कोविड हेल्पलाइनद्वारे श्वसनविषयक व मानसिक लक्षणे यांची माहिती देणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या