FDA ने हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी, अन्न उत्पादक, गोदामे आणि किरकोळ विक्री केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत:
3,137 आस्थापनांची तपासणी
532 FIR दाखल
28.66 लाख किलो निकृष्ट/असुरक्षित अन्नसाठा जप्त
764 सुधारणा नोटिसा जारी
165 परवाने निलंबित
मुंढे यांनी स्पष्ट केले की, परवाना निलंबित म्हणजे कायमस्वरूपी बंद नाही. त्रुटी दूर करून नियमांचे पालन केल्यानंतर संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू करता येतो.
त्यांच्या माहितीनुसार, निलंबित 165 परवान्यांपैकी 103 आस्थापनांनी अपील दाखल केले, पात्र प्रकरणांमध्ये अंतरिम दिलासा देण्यात आला असून 38 प्रकरणांतील निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत, तर 35 अपील प्रलंबित आहेत.
1 ते 31 जुलै या कालावधीत FDA ने:
890 हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी आणि ढाब्यांची तपासणी
329 सुधारणा नोटिसा
116 परवाने निलंबित
स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. सुधारणा नोटीस मिळालेल्या आस्थापनांना 15 दिवसांची मुदत दिली जाते.
गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधातही मोठी मोहीम राबवण्यात आली.
676 दुकानांची तपासणी
658 ठिकाणी बंदी घातलेली उत्पादने आढळली
15.11 कोटी रुपयांचा माल जप्त
519 FIR
701 जणांना अटक
407 आस्थापने सील
6.60 कोटींची 78 वाहने जप्त
487 दूध विक्री आस्थापनांमध्ये:
218 सुधारणा नोटिसा
33 परवाने निलंबित
11 FIR
78.48 लाख रुपयांचे 1.89 लाख लिटर दूध जप्त
476 डेअरी आस्थापनांमध्ये:
196 सुधारणा नोटिसा
16 परवाने निलंबित
2 FIR
3.81 कोटी रुपयांचे जवळपास 1.5 लाख किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त
तपासणीच्या बाबतीत:
पुणे – 941
छत्रपती संभाजीनगर – 453
कोकण – 428
बृहन्मुंबई – 385
नाशिक – 385
नागपूर – 339
अमरावती – 206
जप्तीच्या मूल्यामध्ये:
कोकण – ₹14.08 कोटी
छत्रपती संभाजीनगर – ₹13.34 कोटी
पुणे – ₹10.17 कोटी
FDA च्या म्हणण्यानुसार, या मोहिमेमुळे अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तपासणीपूर्वी आणि सुधारणा झाल्यानंतरची छायाचित्रे व व्हिडिओ नोंदवून नियमांचे पालन सुनिश्चित केले जात आहे.
ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी FDA ने बहुभाषिक AI-आधारित ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर:
ऑनलाइन तक्रार नोंदणी
तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण
प्रलंबित तक्रारींचे एस्कलेशन
तक्रारींचा संपूर्ण ऑनलाइन मागोवा
जलद निवारण
अशी सुविधा उपलब्ध आहे. मुंढे यांनी सांगितले की, FDA ची कार्यपद्धती "Empowerment, Enabling and Enforcement" या तत्त्वांवर आधारित असून, नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषधे उपलब्ध करून देणे हेच विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
हेही वाचा