आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांची होणार भरती

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे.

राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वित्त विभागाला पदभरतीच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील (Maharashtra Health Department) पाच संवर्गातील १० हजार १२७ पदे तातडीनं भरण्याची मागणी केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची १० हजार १२७ पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

'या' पदांसाठी भरती

  • तंत्रज्ञ
  • औषध निर्माता
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक

१० हजार १२७ पदे भरण्याच्या संदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीनं सुरू होईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.


पुढील बातमी
इतर बातम्या