मुंबईतील बांधकाम स्थळांवर मलेरियाचे रुग्ण दुप्पट

2025 च्या पावसाळ्यात शहरातील बांधकाम स्थळांवर मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. कुलाबा, फोर्ट आणि मरीन ड्राइव्ह परिसरातील ए वॉर्डमध्ये बांधकाम स्थळांवर सर्वाधिक रुग्ण आढळले.

BMC कडील आकडे: तपासणी वाढली, तशी रुग्णसंख्या देखील वाढली

महापालिकेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी-मार्च आणि जून-जुलैदरम्यान घेतलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी वाढ दिसून आली.

  • फेब्रुवारी 2025 मध्ये 50,190 बांधकाम कामगारांची तपासणी झाली. त्यापैकी 7 जण पॉझिटिव्ह आले.

  • जून 2025 मध्ये 51,138 कामगार तपासले गेले, त्यापैकी 31 जण पॉझिटिव्ह आले.

याच्या तुलनेत 2024 मध्ये

  • फेब्रुवारी–मार्च: 21,791 तपासणी, 7 पॉझिटिव्ह

  • जून–जुलै: 36,499 तपासणी, 10 पॉझिटिव्ह

एकूण बांधकाम स्थळांवरील मलेरियाचे रुग्ण 2024 मधील 17 वरून 2025 मध्ये 38 वर पोहोचले म्हणजे जवळपास दुप्पट वाढ.

‘ए’ वॉर्डमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह दर

कुलाबा, फोर्ट, मरीन ड्राइव्ह आणि बॅलार्ड इस्टेट पश्चिम भाग समाविष्ट असलेल्या ए वॉर्डमध्ये यंदा सर्वाधिक रुग्ण आढळले. 738 कामगारांपैकी 4 जण पॉझिटिव्ह.

यानंतर सी वॉर्ड (मरीन लाइन्स, कालबादेवी, चिरा बाजार) येथे 791 तपासणीतून 3 रुग्ण आढळले.

काही वॉर्डमध्ये मोठ्या तपासणीनंतरही एकही रुग्ण नाही

  • जी साऊथ वॉर्ड (वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळचा काही भाग) येथे सर्वाधिक 5,282 कामगारांची तपासणी करण्यात आली, मात्र एकही रुग्ण आढळला नाही.

  • एस वॉर्ड (भांडूप, कंजूरमार्ग, विक्रोळी) 3,717 तपासणीतून 0 रुग्ण.

  • बी वॉर्ड (डोंगरी, नागपाडा, भुलेश्वर) सर्वात कमी 228 तपासणीतूनही एकही मलेरिया रुग्ण आढळला नाही.

  • 2025 मध्ये मुंबईत 6,000 हून अधिक मलेरिया रुग्ण

शहरात 2025 मध्ये आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त मलेरिया रुग्ण नोंदवले गेले आहेत. पावसाळा लवकर सुरू होणे आणि अतिवृष्टीमुळे डासांची वाढती पैदास ही प्रमुख कारणे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

BMC च्या आरोग्य विभागाने सांगितले की, बांधकाम स्थळांवरील आक्रमक तपासणी, विस्तारित मोहिम आणि स्क्रीनिंग वाढल्याने यंदा अधिक रुग्ण शोधले गेले.

रुग्ण सापडताच घरांवर सर्वेक्षण आणि तत्काळ उपाययोजना

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एखादा रुग्ण आढळताच सुमारे 200 घरांचे सर्वेक्षण केले जाते आणि ताबडतोब खालील उपाय सुरू होतात:

  • पाणी साचू न देणे

  • फॉगिंग / फ्युमिगेशन

  • परिसरातील जनजागृती

यामुळे पुढील प्रसार रोखण्यास मदत होते.


पुढील बातमी
इतर बातम्या