दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ पश्चिम उपनगरात होत असल्याचं पालिकेच्या अहवालानुसार समोर येत आहे. पालिकेनं जून २०२० मध्ये मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात आंशिक लॉकडाउन लादला होता. तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येत होती. पण दिवाळीनंतर पुन्हा वाढ झाली आहे.
पश्चिम उपनगरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये अव्वल असलेल्या काही प्रभागात के-वेस्टचा समावेश आहे. ज्यात जोगेश्वरी पश्चिम, ओशिवारा आणि अंधेरी पश्चिम हे भाग आहेत. ज्यामध्ये १ हजार ०४० रुग्ण प्रकरणं आहेत. आर-दक्षिण प्रभागात कांदिवलीचा समावेश आहे. इथं ९८७ सक्रिय रुग्ण आहेत, के- पूर्व प्रभागात जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, पश्चिम उपनगरातील इतर वॉर्डात, पी-उत्तरसह, ज्यामध्ये मालाडचा समावेश आहे, त्यात ८५३ सक्रिय रुग्ण आहेत. पी-दक्षिणमध्ये गोरेगावमध्ये ७६४ सक्रिय रुग्ण आहेत. दहिसरच्या आर-उत्तर प्रभागात ५२० सक्रिय, वांद्रे पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम आणि खार वेस्टमध्ये व्यापलेला एच-पश्चिम प्रभाग आणि वांद्रे (पूर्व), वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सांताक्रूझ यासारख्या भागातील एच-ईस्ट प्रभागात ६१७ सक्रिय रुग्ण आहेत. तर (पूर्व) मध्ये ४६८ सक्रिय रुग्ण आहेत.
पालिकेच्या २० डिसेंबर, २०२० च्या आकडेवारीनुसार, पी डीमेलो रोड, आयआर रोड, अब्दुल रेहमान स्ट्रीट, आरबी मार्ग, एमए रोड, जेएमआर मार्ग आणि कर्नाक रोड (लोकमान्य टिळक मार्ग) व्यापलेल्या बी प्रभागात केवळ ८१ सक्रिय रुग्ण आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईत ७८६ नवे रुग्ण आढळले. १ हजार ६५२ रुग्ण बरे झाले. तर १३ जणांचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १३ हजार १३२ सक्रिय रूग्ण आहेत. २ लाख ५१ हजार १९१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं अन्न वितरण एजंट, सलून कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. वाढत्या चाचणीमुळे आणि तेथे सकारात्मकतेचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी झाले आहे. जे निश्चितच चांगली चिन्हे आहेत.