कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या सप्टेंबर महिन्यात

मुंबईत सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक वाढला. रुग्णांची घटलेली संख्या पुन्हा वाढली. त्यामुळं महापालिकेनं या महिन्यात चाचण्यांची संख्याही मुंबई वाढवली.

या एका महिन्यात पावणे चार लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील ६ महिन्यांशी तुलना केली असता या महिन्यात सर्वात जास्त चाचण्या झाल्या आहेत. ऑगस्टमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर एकदम कमी झाला होता. त्यावेळी कोरोना नियंत्रणात येत असल्याबाबत आशा निर्माण झालेली असतानाच सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या वाढू लागली.

वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेनं चाचण्या ही वाढवल्या. त्यानुसार, सध्या दिवसभरात १३ ते १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच जलद निकाल देणाऱ्या प्रतिजन चाचण्यांचाही समावेश आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे मोठ्या संख्येनं रुग्णांची नोंद होऊ लागली आहे.

महापालिकेची आकडेवारी

  • आतापर्यंतच्या ११.४४ लाख चाचण्यांपैकी निम्म्या म्हणजेच ५२ टक्के चाचण्या या केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील आहेत.
  • या २ महिन्यात ५.८० लाख चाचण्या करण्यात आल्या.
  • मे महिन्यात दर दिवशी सरासरी ३८७२ चाचण्या करण्यात येत होत्या.
  • जूनमध्ये हीच संख्या ४४२२ वर गेली होती.
  • जुलै मध्ये दर दिवशी ७ हजार चाचण्या केल्या जात होत्या.
  • सप्टेंबरमध्ये दर दिवशी सरासरी ११ हजार चाचण्या केल्या जात आहेत.
पुढील बातमी
इतर बातम्या