मुंबईत म्युकर मायकोसिस नियंत्रणात

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे.  त्यानंतर आता  म्युकर मायकोसिसही नियंत्रणात आणण्यास मुंबई महापालिकेला यश आलं आहे.  मुंबईत सध्या म्युकर मायकोसिसचे ३० सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  आतापर्यंत २७३ जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली होती. त्यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. 

म्युकर मायकोसिस रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू आहेत. म्युकर मायकोसिसची लागण झालेल्या मुंबईबाहेरील ६४१ रुग्णांवर मुंबईत उपचार करण्यात आले. यामध्ये १३२ जणांचा मृत्यू झाला. तर ४४० जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे मुंबईबाहेरील सध्या ६९ सक्रिय रुग्ण आहेत.  तर मुंबईत एकूण ९१४ म्युकर मायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील १८८ जणांचा मृत्यू झाला. तर ६२६ जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केल्याने एकूण १०० सक्रिय रुग्ण आहेत.

म्युकर मायकोसिसची लागण झाल्यास डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून बुरशीजन्य दुर्गंधीयुक्त काळा स्राव येणे, डोके दुखणे अशा लक्षणानंतर म्युकर मायकोसिचा विषाणू मेंदूवरही आघात करतो. 

पुढील बातमी
इतर बातम्या