मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवर

कोरोनामुळं (corona) मागील अनेक महिन्यांपासून त्रासलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसत असून, मुंबईतील रुग्ण दुपटीचा (patients increase) कालावधी १२६ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील २४ विभागांपैकी २१ विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांपेक्षा जास्त आहे. तर परळ, शिवडी विभागात हा कालावधी २२४ दिवसांवर गेला आहे.

रुग्ण संख्या कमी झालेली असली तरी दैनंदिन मृत्यू संख्या कमी होत नसल्याचं चित्र आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग ०.५५ टक्के झाला आहे. मुंबईत रविवारी १,२२२ रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या २,५१,२८३ वर पोहोचली आहे. एका दिवसात १०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २,२०,१६५ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९, ७२१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ११४८ रुग्ण गंभीर आहेत.

रविवारी ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनामुळे १०,०६२ रुग्णांचा बळी गेला आहे. ४६ मृतांपैकी ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश होता. मुंबईमध्ये (mumbai) सध्या दर दिवशी ४५ ते ५०रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्याशिवाय, कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालेले मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरलं आहे. सध्या मुंबईतील ८५०० इमारती प्रतिबंधित असून त्यापैकी १३१६ इमारती बोरिवलीतील आहेत. बोरिवलीत सध्या एकूण बाधितांची संख्या १७ हजारापर्यंत गेली आहे.


हेही वाचा - 

पुढील बातमी
इतर बातम्या