मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ, मेट्रोचं काम कारणीभूत

(Representational Image)
(Representational Image)

दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. यावर्षी, मुंबईत मलेरियाची प्रकरणे तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहेत.

अलीकडील प्रशासकिय आकडेवारीनुसार, शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान ५,०३२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०२० मध्ये ५,००७ प्रकरणं आणि २०१९ मध्ये ४,३५७ प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

कीटकनाशक विभागाचे प्रमुख, राजन नारिंग्रेकर यांनी सांगितलं की, मलेरियाची जवळपास ७० टक्के प्रकरणं मेट्रोच्या कामामुळे वाढले आहेत. ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच्या खोलापर्यंत जाऊन फवारणी करणं कठीण आहे.

असं असलं तरी, प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाही, डासांमुळे होणा-या रोगामुळे मृत्यूची नोंद झाली नाही. बहुतेक प्रकरणं जी-उत्तर, ई आणि एफ-दक्षिण या वॉर्डांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. दुसरीकडे, उपनगरांमध्ये, कांदिवली, बोरिवली आणि मालाडमधील ठराविक भागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी इतकी प्रकरणं नोंदवली गेली नाहीत.

मलेरिया व्यतिरिक्त, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १२९ च्या तुलनेत या वर्षी ८५७ रुग्णांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये ९२० प्रकरणं नोंदवली गेली होती. शिवाय, गेल्या तीन वर्षांत डेंग्यूने तीन जणांचा बळी घेतला आहे.

दुसरीकडे, लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणं स्थिर राहिल्यानं मृत्यूचं प्रमाण घटलं आहे. २०१९ मध्ये, ११ मृत्यूची नोंद झाली. तर २०२० आणि २०२१ मध्ये अनुक्रमे ८ आणि ४ मृत्यू नोंदवले गेले. २०१९ मध्ये ७,७८५ प्रकरणांच्या तुलनेत १२ डिसेंबरपर्यंत गॅस्ट्रोएन्टेरायटिसची नोंद झालेली प्रकरणे २,८१८ होती.


RT-PCR चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट कसा प्री-बुक कराल?

विमानतळावर येणाऱ्यांना RT-PCR चाचणी प्रीबुक करणं बंधनकारक

पुढील बातमी
इतर बातम्या