बीएमसी शाळांमधील 160 विद्यार्थ्यांना टीबीची लागण

दरवर्षी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी केले जाते. या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त एका वेबसाईटने केले आहे. 

आरोग्य विभागाच्या बीएमसी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीत 160 मुलांना क्षयरोग, 24 मुलांना हृदयविकार आणि तीन जण कुष्ठरोगाने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करावी लागते.

BMC नुसार, जून 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान, इयत्ता 1 ते 10 मधील 2,37,992 विद्यार्थ्यांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. एकूण विद्यार्थ्यांपैकी 46,684 विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी BMC क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये 160 विद्यार्थ्यांना क्षयरोग, 24 जणांना हृदयरोग आणि तीन जण कुष्ठरोगाने ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या