नवी मुंबई महापालिकेचा कोरोनावर 'इतका' कोटींचा खर्च

नवी मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्यास सुरूवात झाली. महापालिकेची कोरोनापूर्वी आरोग्य सुविधा तोकडी होती. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिकेला आरोग्य सेवेवर मोठा खर्च करावा लागला.  पालिका प्रशासनाला आरोग्यव्यवस्थेत वाढ करण्याबरोबर मनुष्यबळाची मोठी भरती करावी लागली. तसंच कोरोना रुग्णालय, प्रयोगशाळा उभारण्यासाठी पालिकेने मोठा खर्च केला. 

महापालिकेने कोरोनावर आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी १०४ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने या खर्चात वाढ होणार आहे. पालिकेने अनुदानापोटी २९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मात्र, फक्त १० कोटींचा निधी पालिकेला मिळाला आहे.

नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर पालिकेने २० दिवसांत सिडको प्रदर्शनी केंद्रात ११८३ खाटांचं रुग्णालय उभारलं. तसंच नेरुळे येथे स्वतंत्र प्रयोगशाळा उभारली, तर शहरात विविध ठिकाणी प्राणवायू, अतिदक्षता खाटांची व्यवस्था केली. रुग्णांसाठी जेवणासह मनुष्यबळाचा खर्च पालिकेला सोसावा लागला. त्यामुळे कोरोनावर आतापर्यंत पालिकेचे १०४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

नवी मुंबईत आता कोरोना रुग्णवाढ होत असलेल्याने बंद केलेली आरोग्य सुविधा व मनुष्यबळ भरती करावे लागणार आहे. चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या