प्रसूती रजेसाठी दोन वर्षांची अट

  • शेखर साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई – महानगरपालिकेच्या सेवेत नव्याने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेनंतर लगेच नोकरी सोडता येणार नाही. प्रसुती रजेनंतर नोकरी सोडायची असल्यास किमान दोन वर्षे नोकरी करावी लागेल असा नियम पालिकेने तयार केला असून सोमवारी विधी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

पालिकेच्य़ा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रसुती रजेच्या नियमात महापालिकेने सुधारणा केली आहे. यानुसार प्रसुती रजेचा कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवस करण्यात आला आहे. मात्र ही रजा घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांच्या वेतनाच्या रकमेचे प्रतीज्ञापत्र भरून द्यावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना प्रसुती रजा आणि रजा वेतन देण्यात येईल. त्याशिवाय प्रसूती रजा संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला किमान दोन वर्षे महापालिकेची नोकरी करणे बंधनकारक राहणार आहे.

तसेच एखाद्या महिला कर्मचाऱ्याला प्रसूती रजेनंतर महापालिकेची नोकरी सोडायची असल्यास त्यांना प्रसूती रजा काळात मिळालेली वेतनाची संपूर्ण रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करणे बंधनकारक राहणार आहे. ही रक्कम भरल्यानंतरच त्यांना नोकरी सोडता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या