महापालिकेच्या संलग्न रुग्णालयांत अन्य रुग्णांवरच उपचार

मुंबईत सध्या कोरोनासोबत साथीच्या आजारांनी डोक वर काढलं आहे. अनेकांना मलेरियाची लागण झाली आहे. अशातच पावसाळा सुरू झाल्यामुळे हिवताप, डेंग्यूसारखे साथीचे आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या काही रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांमध्ये साथीचा आजार आणि अन्य व्याधी झालेल्या रुग्णांवरच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या निर्णयानुसार सोमवारपासून उपचाराला सुरुवात करण्यात येणार असून २६ दवाखाने, ७ रुग्णालये आणि ३ प्रसूतिगृहांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. नायर रुग्णालय सध्या ‘कोरोना रुग्णालय’ म्हणूनच कार्यरत आहे.

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना घरी पाठविल्यानंतर तेथे कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात येणार नाही. मात्र या सर्व संलग्न रुग्णालयांमध्ये करोनाविषयक बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे. केवळ अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील करोना बाह्यरुग्ण विभागात बाधित आल्यास त्याला संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात येईल.


हेही वाचा -

Coronavirus Pandemic : राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत कोरोनाचे १०४६ नवे रुग्ण, दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या