एमआरआय करायचाय... चार महिन्यांनी या!

मुंबई – लोकमान्य टिळक रूग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांची हेळसांड होतेय. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीयेत, याच एक उत्तम उदाहरण बुधवारच्या पालिकेच्या स्थायी समितीतील हरकतीच्या मुद्दयावर समोर आलय. रूग्णालयात एमआरआयसाठी आलेल्या एका गरीब आणि ज्याच्यावर त्वरीत उपचार सुरू होणे गरजेचे आहे अशा रूग्णाला चक्क चार महिन्यानंतरची तारीख देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते प्रविण छेडा यांनी स्थायी समितीत दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही हा प्रश्न उचलून धरत शीव रूग्णालयातील असुविधांबाबत संताप व्यक्त केला. पालिकेच्या रूग्णालयात सिटीस्कँन, स्पाईन एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने रूग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. केईएम रूग्णालयातील स्पाईन एमआरआय मशिन गेल्या चार वर्षांपासून बंदावस्थेत असल्याचे सांगत काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांनी रूग्णालायांतील असुविधांचा पाढा वाचला. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याबाबतची माहिती प्रशासनाने पुढील बैठकीत द्यावी असे निर्देश दिलेत.

पुढील बातमी
इतर बातम्या