१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी न करताही मिळणार लस

लसीकरणाच्या मोहिमेत सरकारनं नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रेजिस्ट्रेशन आवश्यक नाही.

नवीन नियमानुसार ते आता सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष रेजिस्ट्रेशन करून बुकिंग करू शकतील. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असणार आहे.

केंद्र सरकारनं सर्वच राज्यांना ही माहिती दिली आहे. या सुविधेनं नागरिक आणि लसीकरणासाठी ऑन साइट अर्थात लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लसीकरणाची बुकिंग आणि लस दोन्ही एकदाच करू शकतील.

पण, महाराष्ट्रात सध्या लसींच्या कमतरतेमुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे.

दरम्यान केंद्र सरकारनं शनिवारी एक निर्णय जारी करून कामाच्या ठिकाणीच लसीकरण करण्यास मंजुरी दिली. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालये, कंपन्या आणि आस्थापनांमध्ये ही सुविधा घेता येईल.

केवळ कर्मचारीच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा यात लस घेऊ शकतील. विशेष म्हणजे, अशा स्वरुपाच्या लसीकरणासाठी कंपन्या रुग्णालयांमधून किंवा थेट निर्मात्यांकडून लस खरेदी करू शकतील. यामुळे लसीकरणाला चालना मिळेल असं सरकारनं म्हटलं आहे.

देशभर १ मे पासून १८ ते ४४ वर्ष वयाच्या व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये लसींच्या अपुऱ्या पुरवठ्याचं कारण देऊन ते पुढे ढकलण्यात आलं.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना राज्यात २४ तास लसीकरण करणार असल्याचं आश्वस्त केलं आहे. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रातच झालं आहे.


हेही वाचा

डोर-टू-डोर लसीकरण राबवण्यात गोरेगावमधील 'या' सोसायटीचा पहिला क्रमांक

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या