Coronavirus Updates: बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातही विलगीकरण कक्ष

 कस्तुरबापाठोपाठ आता जोगश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कोरोनासाठी बाह्यरुग्ण सेवा आणि विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

कस्तुरबामधील बाह्यरुग्ण विभागात दरदिवशी मोठी गर्दी असते. त्यामुळे जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा बुधवारपासून सुरू झाली आहे. येथे २० खाटांचा विलगीकरण कक्षही सुरू केला आहे. येथे तपासणी सुविधा उपलब्ध नाही. मात्र, येथील संशयित रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तेव्हा या भागातील प्रवाशांनी ट्रॉमा केअर रुग्णालयातील बाह्यरुग्ण  विभागात तपासणीसाठी जावे, असे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शाह यांनी सांगितले.

 पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही प्रवाशांना जायचे नाही. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी विमानतळाजवळच चार खासगी हॉटेलमध्ये अलग राहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र प्रवाशांना याचा खर्च द्यावा लागेल. सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टर दररोज यांची तपासणी करणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध झाले आहेत. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात सध्या सेवा उपलब्ध आहेत. येथे १५ खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू झाला असून अन्य काही खासगी रुग्णालये लवकरच ही सेवा सुरू करतील, असे डॉ.दक्षा शाह यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या